Uddhav Thackeray : शिवसेना बंडखोरांनी नव्हे, भाजपनं फोडली, उद्धव ठाकरेंनी केलं विधान
उत्तर भारतीय एकता मंचच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवन येथे बैठक पार पडली. यावेळी "शिवसेनेत फूट बंडखोरांनी नव्हे तर भाजपनं पाडली" असं विधान उद्धव ठाकरेंनी केल्याचं समोर आलंय तर "तुम्ही माझ्या भात्यातील कितीही बाण न्या, पण ते बाण चालवण्यासाठी धनुष्य तर लागेल ना? पण हे धनुष्य मात्र माझ्याकडेच आहे हे लक्षात ठेवा" असंही विधान उद्धव ठाकरेंनी केल्याचं समोर आलंय.