Sanjayy Raut : मुंबई आणि ठाण्यात ठिकऱ्या गद्दारांच्या उडणार - संजय राऊत
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, निवडणूक आयोगाच्या (Election Commission) विरोधात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) एकत्र येत असल्याचे संकेत मिळत आहेत. 'अनंत दिघे (Anand Dighe) हे तुळशी वृंदावन होतं आणि त्या तुळशी वृंदावनामध्ये उगवलेली एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांची चाळीस चोर ही भांगीची रोपटी आहेत,' असा घणाघात शिंदे गटावर करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या कामावर दबाव असल्याचा आरोप करत, पुरावे देऊनही आयोग ऐकत नसल्यास रस्त्यावर उतरून दणका देण्याचा इशारा विरोधी पक्षांनी दिला आहे. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी मुस्लिमांना 'नमक हराम' म्हटल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यावर, 'मुसलमान नमक हराम नाहीत, कारण त्यांनी २०१४ मध्ये यूपी आणि बिहारमध्ये मोदींना भरभरून मतं दिली आहेत,' असे प्रत्युत्तर देण्यात आले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement