OBC Politics: 'कोण बबनराव तायवाडे, मला माहित नाही', Chhagan Bhujbal यांचा सवाल, वादाला नवं तोंड

Continues below advertisement
ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. 'कोण बबनराव काय वाडे आपल्याला माहिती नाही', अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यासोबतचा जुना व्हिडिओ जाहीर सभेत दाखवल्याने तायवाडे यांनी भुजबळांवर नाराजी व्यक्त केली होती. भुजबळ हे समाजाचे ज्येष्ठ नेते आणि वडिलांच्या स्थानी आहेत, त्यामुळे एखाद्याकडून झालेली चूक त्यांनी जाहीरपणे चव्हाट्यावर आणायला नको होती, असे तायवाडे म्हणाले. 'ते आमच्या वडिलांच्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारे आम्ही सर्व त्यांना जेव्हा आपले वडील मानतो तो पुरांकडून झालेली चूक त्यांनी पांघरुन घ्यायला पाहिजे होती,' असे मत तायवाडे यांनी व्यक्त केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola