Udayanraje Bhosale : छत्रपती संभाजीराजेही श्रेष्ठ होते, त्यांची विनाकारण बदनामी केली गेली
Continues below advertisement
छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराजही श्रेष्ठ होते, पण कारण नसताना त्यांना बदनाम करण्यात आलं, अशा शब्दांत खासदार उदयनराजे यांनी त्यांच्या मनातील असंतोष व्यक्त केला. मनात विकृती असणाऱ्यांनी अशी बदनामी केली. धाडस असेल तर अशा लोकांनी कोणत्याही व्यासपीठावर येऊन उघडपणे चर्चा करावी, असं आव्हानही त्यांनी दिलं. उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात शिवराज्याभिषेक नाट्य आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना उदयनराजे यांनी छत्रपती संभाजीराजेंबद्दल भाष्य केलं.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Udayanraje Bhosale Sambhajiraje Sambhaji Maharaj Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv