Transgender Toilets : तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, उच्च शिक्षण विभागाचा निर्णय
राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांना आता तृतीयपंथियांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय करावी लागणार आहे. त्या संदर्भात उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी निर्देश दिले आहेत. तृतीयपंथी व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने याआधी २०१९ मध्ये याविषयी राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले होते. आणि त्यानंतर आता हे थेट आदेश देण्यात आले आहे.