Udayanraje Bhosale meet Ramraje Nimbalkar : उदयनराजे भोसले रामराजे निंबाळकरांच्या भेटीला
Udayanraje Bhosale meet Ramraje Nimbalkar : उदयनराजे भोसले रामराजे निंबाळकरांच्या भेटीला बातमी आहे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेेते रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपच्या छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या भेटीची.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर होते.. या कार्यक्रमाला छत्रपती उदयराजे भोसलेही फडणवीसांसोबत उपस्थित होते.... मात्र जसं फडणवीसांच्या हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने टेकऑफ घेतलं..तसं छत्रपती उदयनराजेंचा ताफा रामराजे नाईक निंबाळकरांच्या घराकडे वळला. गेल्या लोकसभेवेळी एकमेकांवर चिखलफेक करणाऱ्या दोन राजेंनी आज एकमेकांची भेट घेतली. अगदी दोघांची गळाभेटही झाली.. या भेटीदरम्यान दोन्ही राजेंमध्ये तिकिटावरुन चर्चा झाली. तुम्ही तिकिट द्या म्हणजे मी तुमच्या पायाशी येऊन बसतो.. म्हणजे आपल्या दोघांच बर चालेल असं रामराजे नाईकांनी उदयनराजेंना म्हटलंय.