Maharashtra Income Tax Raids : Income Tax विभागाच्या छापेमारीवर Udayan Raje यांची पहिली प्रतिक्रिया
Continues below advertisement
सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून गुरुवारी छापे टाकण्यात आले. या प्रकरणावर भाजप नेते खा उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘मला यावर काहीही वाटत नाही मी सर्वसामान्य माणूस आहे. त्यामुळे लोकांची जशी मानसिकता बधिर झाली आहे, तशीच अवस्था माझीही आहे. या धाडींबद्दल मला काही माहिती नाही. सध्या धाडी इकडे पडतात, धाडी तिकडे पडतात, पण लोकांनी यातून बोध काय घ्यायचा हा नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न पडला आहे. आता काय प्रत्येक ठिकाणी ही एक फॅशन झालीय’, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
Continues below advertisement