Tata Sons : Air India ची घरवापसी; 68 वर्षांनी Air India पुन्हा TATA कडे

टाटा सन्सने (Tata Sons) एअर इंडियाच्या (Air India) निर्गुंवणुकीसाठी लावलेली बोली जिंकली आहे. आज अधिकृतपणे टाटांनी एअर इंडियासाठी लावलेली बोली जिंकल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. टाटा सन्सने एअर इंडियासाठी 18 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. तर दुसरे खरेदीदार असलेल्या अजय सिंह यांच्या स्पाईसजेटने एअर इंडियासाठी 15100 कोटी रुपयांची बोली लावली होती. या दोन्ही खरेदीदारांच्या बोली अंतिम फेरीसाठी पात्र असल्याचं एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी गठित करण्यात आलेल्या मंत्रिस्तरीय समितीने जाहीर केलं होतं.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola