Udayan Raje Bhosale प्रतापगडावरील शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर की दांडी?

Continues below advertisement

Udayan Raje Bhosale प्रतापगडावरील शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर की दांडी?

364 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याला बोलावून अफझल खानाला यमसदनी धाडलं आणि आदिलशाहीवर वचक बसवला. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची ही गाथा दरवर्षी किल्ले प्रतापगडावर जागवली जाते. यंदा तर प्रतापगडावरील अफझलखानाच्या कबरीजवळचं अतिक्रमणही प्रशासनानं हटवत गेले अनेक वर्षांपासूनची शिवप्रेमींची मागणी पूर्ण केलेय. त्यामुळे यंदा या कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणीत झाला. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रतापगडावर शिवप्रतापदिन साजरा होणार आहे. सकाळी साडे दहा वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतापगडावर ध्वाजारोहण होणार आहे. यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात येईल. मात्र उदयनराजे अनुपस्थित असल्यानं चर्चांना उधाण आलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram