नितेश राणे यांना व्हॅलेंटाईन रिर्टन गिफ्ट, वैभववाडी नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकणार : Uday Samant
Continues below advertisement
वैभववाडी मध्ये भाजपला मोठा धक्का, सात नगरसेवकांसह प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा. वैभववाडी नगरपंचायतची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली असतानाच मोठी उलथापालथ. सात ही नगरसेवक शिवबंधन बांधणार असल्याची माहिती. या सात नगरसेवकांमध्ये चार माजी नगराध्यक्ष आहेत. वैभववाडी नगरपंचायत मध्ये भाजपची एकहाती सत्ता होती,१७ च्या १७ नगरसेवक हे भाजपच्या गोट्यातील होते. पक्षांतर्गत धुसफूसीतून निर्णय घेतल्याचे समजते. या प्रकरणामुळे सिंधुदुर्गात मात्र मोठी खळबळ. वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्ष नासिर काझी यांच्याकडे राजीनामे सुपूर्द.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement