Uday Samant on Shivsena : एकनाथ शिंदे पु्न्हा ठाकरेंना धक्का देणार? उदय सामंतांचा सर्वात मोठा दावा
Uday Samant on Shivsena : एकनाथ शिंदे पु्न्हा ठाकरेंना धक्का देणार? उदय सामंतांचा सर्वात मोठा दावा
म्हणजे काल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल ज्या काही वलगना केल्या होत्या, त्याच उत्तर आज मला द्यायच आहे आणि आज मी जी ब्रेकिंग आपल्याला देतोय ही पुढच्या दोन महिन्यामध्ये 100% खरी होणार आहे. माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युबीटीच्या चार आमदारांनी, काँग्रेसच्या पाच आमदारांनी आणि यूबीटीच्या तीन खासदारांनी. मागच्या 15 दिवसांमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे याचा रेकॉर्ड देखील आहे. जवळजवळ 10 माजी आमदार युबीटीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत. अनेक जिल्हाप्रमुख संपर्कात आहेत. काँग्रेसचे देखील अनेक जिल्हााध्यक्ष, अनेक माजी खासदार, माजी आमदार संपर्कात आहेत. आणि येत्या तीन महिन्यात हे सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात करणार आहे. ही खऱ्या अर्थान आजची ब्रेकिंग आहे. त्याच्यामुळे नाहक ज्या पक्षाचा अस्त झालाय त्या पक्षाच्या लोकांनी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, स्वतःच्या पक्षाचा उदय होण्यासाठी माझ्या नावाचा वापर करणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून ही जी मंडळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मागच्या महिन्याभरात भेटलेली आहे. यांना त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न करावा, परंतु ठामपणाने सांगतो की ह्या सगळ्या व्यक्ती आता... उबाठामध्ये किंवा काँग्रेसमध्ये थांबणार नाहीत, त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याची प्रचिती आपल्याला पुढच्या तीन महिन्यामध्ये येईल