Uday Samant : जिथे शिवसेनेचे खासदार, तिथे आमचा दावा; उदय सामंत यांचं वक्तव्य ABP Majha

Continues below advertisement

Uday Samant : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा राज्यसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीतून पत्ता कट झाल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency) नारायण राणेंना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनाच लढणार असे वक्तव्य केल्याने नारायण राणेंना जागा सोडण्यास शिवसेनेचा नकार आहे का? अशी चर्चा होत आहे. 

उदय सामंत म्हणाले की, सरकारचे नेतृत्व एकनाथ शिंदे (Eknath Shinde) करतात. ते म्हणाले की, लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू. त्यामुळे आम्ही 45 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत. जागांची चर्चा आमचे तीन नेते मिळून करतील. रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा शिवसेनेने लढली आहे. त्यामुळे ती जागा शिवसेनाच लढेल. शिवसेनेने जागा लढवावी, अशी माझी इच्छा आहे. पण निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे त्यांनी म्हटले आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram