Tuljapur Navratri : तुळजाभवानीचा शाकंभरी नवरात्रोत्सव सुरू, घटस्थापनेनं प्रारंभ
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजपासून तुळजापूरला शाकंभरी नवरात्रोत्सव सूरू झाला. श्री तुळजाभवानी देविजींची मंचकी निद्रा पूर्ण झाल्यानंतर देविजींची मुख्य मुर्ती पहाटे सिंहासनावर विधिवत प्रतिष्ठापीत करण्यात आली. दुपारी 12 वाजता श्री तुळजाभवानी मंदिरातील गणेश ओवरीत श्री शाकंभरी देविजींची प्रतिमा प्रतिष्ठापीत झाली. तिथे घटस्थापना करण्यात आली. घटस्थापनेपाठोपाठ शाकंभरी नवरात्रोत्सवास शुभारंभ झाला. शाकंभरी नवरात्रोत्सवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शाकंभरी नवरात्रोत्सवातील प्रमुख असा जलयात्रेचा सोहळा कोरोना पार्श्वभूमीवर साधेपणाने येत्या शुक्रवारी सकाळी मकरसंक्रांती दिवशी संपन्न होईल . श्री तुळजाभवानी देविजींच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त दैनंदिन विविध यजमानांचा हस्ते शाकंभरी देविजींची मंगल आरती करण्यात येणार आहे.