Kolhapur : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आता तासाला केवळ 400 भाविकांना दर्शन
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये आणि दख्खनचा राजा जोतिबा मंदिरामध्ये आजपासून तासाला केवळ चारशे भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनाचे संकट वाढत असताना दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली आहे. ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणारे पास हे देखील तासाला केवळ 400 असणार आहेत. याआधी तासाला एक हजार भाविकांना अंबाबाई मंदिरामध्ये प्रवेश दिला जात होता. अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना ओठी किंवा तेल घेऊन जाता येणार नाही. ही अंमलबजावणी आजपासूनच सुरू करण्यात आली आहे.