Tuljapur Drugs Case: आरोपीच्या भाजप प्रवेशावरून Supriya Sule आक्रमक, 'कारवाई करा'.
Continues below advertisement
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील (Tuljapur Drugs Case) जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीने भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून तीव्र चिंता व्यक्त केली आहे. 'ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय,' असा थेट आरोप करत सुप्रिया सुळे यांनी या पक्षप्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पक्षात प्रवेश कसा दिला जाऊ शकतो, असा सवाल त्यांनी पत्रात विचारला आहे. या संपूर्ण प्रकरणी तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणीही सुळे यांनी केली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, आता पक्षश्रेष्ठी यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement