Shiv Sena Symbol War: धनुष्यबाण कुणाचा? Supreme Court मध्ये आजपासून अंतिम सुनावणी सुरू

Continues below advertisement
शिवसेना पक्ष आणि त्याचे निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' यावरील हक्कासाठी सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी सुरू होत आहे. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर, निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत 'शिवसेना' म्हणून मान्यता देत धनुष्यबाण चिन्ह दिले होते. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 'दोन हजार बावीस साली एकसंध शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याच्या आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय.' या प्रकरणावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola