Tuljapur Dharashiv Bhendoli Utsav : तुळजापुरात धगधगत्या अग्नीचा थरारक 'भेंडोळी' उत्सव

Continues below advertisement

Tuljapur Dharashiv Bhendoli Utsav : तुळजापुरात धगधगत्या अग्नीचा थरारक 'भेंडोळी' उत्सव
तुळजापुरात धगधगत्या अग्नीचा थरारक 'भेंडोळी' उत्सव  भेंडोळी उत्सव देशभरात दोन ठिकाणी, उत्तरेत काशी आणि दक्षिणेत तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे उत्सव  तुळजाभवानी देवीच्या मंदिरात अश्विन अमावस्येला भेंडोळी उत्सव साजरा केला जातो. काळभैरवनाथ हा देवीचा रखवालदार आहे आणि त्याची फिरणं रात्रीचं असतं त्याला उजेड हवा म्हणून हा भेंडोळी उत्सव असल्याची अशी आख्यायिका आहे.  काळभैरवनाथ आला काशीचा कोतवाल म्हटलं जातं त्याची ठाणे भारतात सर्वत असली तरी भेंडोळी उत्सव उत्तरित काशी आणि दक्षिणेत तुळजापूर येथेच फक्त साजरा होतो. आगीच्या ज्वालासह एका छोट्याशा रस्त्यातून भेंडोळी घेऊन देवीच्या मंदिरात जाणं हा एक थरारक अनुभव असतो. भेंडोळी प्रज्वलनानंतर कालभैरव मंदिरापासून श्रीतुळजाभवाणी देवीच्या मंदिरात आणली जाते. नंतर देवीला पदस्पर्श करून मंदिराला प्रदक्षिणा करून वेशीबाहेर आणून भेंडोळी विझवली जाते.  भेंडोळी काय आहे ?   भेंडोळी म्हणजे एका अकरा फूट लांब व साधारण सात ते आठ इंच जाडीच्या काठीला (दांड) मधोमध कच्च्या केळीचा अखंड घड बांधला जातो. नंतर संपूर्ण दांडावर केळीच्या खोडाचे जे साल गुंडाळतात नंतर चिंचेच्या झाडाच्या छोट्या छोट्या फांद्यांचा एक थर संपूर्ण दांडावर लावला जातो. यावर आंबड्याच्या झाडाची साल व पीळ घातलेल्या दोरीचा वापर करून सर्व बांधणी झाल्यानंतर एका लोखंडी साखळदंडामध्ये सुती कपड्याचे पलिते तेलामध्ये बुडवून ओवले जातात. भेंडोळीची संपूर्ण बांधणी तयारी व भेंडोळी प्रज्वलन श्री काळभैरव मंदिराच्या समोर केली जाते.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram