MVA And Mahayuti Challenge : मविआ, महायुतीपुढे टेन्शन बंडखोरी संपवण्याचं

Continues below advertisement

MVA And Mahayuti Challenge : मविआ, महायुतीपुढे टेन्शन  बंडखोरी संपवण्याचं

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. आत्तापर्यंत महाविकास आघाडी आणि महायुतीने जवळपास महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढती पाहायला मिळणार आहेत. 2019 च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अनेक राजकीय वळणं आली. त्यातून महाविकास आघाडीत 3 आणि महायुतीत 3 पक्षाचं अस्तित्व निर्माण झालं आहे. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे राज्यात दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवारी न मिळालेला मोठा वर्ग आहे. उमेदवारी न मिळालेल्या अनेकांनी बंडखोरीचं हत्यार उपसलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, अनेक मतदारसंघात राजकीय बंडखोरांनी तोंड वर काढल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा 1995 सारखी परिस्थिती येऊ शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करु लागले आहेत. कारण 1995 मध्ये राज्यात 45 आमदार हे अपक्ष निवडून आले होते. तत्कालीन काळात काँग्रेसमध्ये गटा तटाचं राजकारण वाढलं होतं. त्यामुळे तिकीट कापण्यात आलेल्या अनेक नेत्यांनी बंडखोरी करत निवडणुका लढवल्या होत्या. दरम्यान, 1995 नंतर निवडणुकीतनंतर अनेक अपक्ष आमदार निवडून आले होते. दरम्यान, त्यावेळी भाजप नेते गोपीनाथ मुंडे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अपक्षांची मोट बांधत त्यांना सोबत घेतलं होतं. त्यामुळे राज्यात सेना-भाजप युतीचं सरकार मजबूत होण्यासाठी मदत झाली होती. दरम्यान, 1995 नंतर अपक्षाचं महत्त्व देखील वाढलं होतं. अनेक अपक्ष आमदारांना राज्यमंत्रिपद देण्यात आली होती.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram