Tuljapur Bandh : तुळजाभवानी विकास आराखड्यातील दर्शन मंडप वाद, तुळजापूर बंदची हाक
Continues below advertisement
Tuljapur Bandh : अवघ्या काही दिवसांवर नवरात्रोत्सव (Navratri 2023) येऊन ठेपला असतानाच उद्या अवघ्या महाराष्ट्राचं (Maharashtra News) श्रद्धास्थान असलेल्या तुळजापुरात (Tuljapur News) बंदची हाक देण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदीर विकास प्रारूप आराखड्यातील (Tuljabhavani Temple Development Format Plan) दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद सुरु झाला आहे. दर्शन मंडप हा घाटशीळ येथे करण्यास काही पुजारी, काही व्यापारी, काही स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळेच त्यांनी तुळजापूर शहर बंदचं (Tuljapur Bandh Tomorrow) आवाहन केलं आहे.
Continues below advertisement