Tuljapur Band : आज तुळजापूर बंदची हाक, बंदचा निर्णय मागे घ्यावा - राणा जगजितसिंह पाटील

Continues below advertisement

 आज तुळजापूर बंदची हाक, तुळजाभवानी विकास आराखड्यातील दर्शन मंडप वाद... अवघ्या काही दिवसांवर नवरात्रोत्सव  येऊन ठेपला असतानाच  तुळजापुरात आज बंदची हाक देण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद सुरु झाला आहे. दर्शन मंडप हा घाटशीळ येथे करण्यास काही पुजारी, काही व्यापारी, काही स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. 
दर्शन मंडप  तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार येथे असावा अशी पुजारी आणि व्यापाऱ्यांची मागणी आहे. तर दर्शन मंडपाची जागा बदलल्यास काही व्यापाऱ्यांचं आणि, काही स्थानिक नागरिकांचं नुकसान होणार  त्यामुळे दर्शन मंडपाची जागा बदलण्यास व्यापारी, नागरिकांनी विरोध दर्शवलाय त्याविरोधात आज तुळजापूर बंदची हाक देण्यात आलीये.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram