Tuljabhavani Mandir Dhakkabukki : तुळजाभवानी मंदिरात महिलेस धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल
Continues below advertisement
Tuljabhavani Mandir Dhakkabukki : तुळजाभवानी मंदिरात महिलेस धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात दर्शनास आलेल्या महिला भक्ताला सुरक्षा रक्षकाकडून धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमात व्हायरल होतोय.तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भक्ताला मंदीर संस्थांनच्या बिव्हीजी सुरक्षा रक्षकाकडून धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती आहे. यावरून मंदिरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असुन सदरील सुरक्षा रक्षकावर तुळजाभवानी मंदिर प्रशासन काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलय दरम्यान सध्या सुट्टीचे दिवस असल्याने मोठय़ा प्रमाणावर भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरात येत असुन या झालेल्या प्रकारामुळे भाविकांत मोठी नाराजी पसरली आहे.
Continues below advertisement