Tukaram Supe MHADA Exams: सुपेंची आणखी किती 'छुपी' माया, आणखी 33 लाख रुपये जप्त ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या घरी, कार्यालयांमध्ये सापडणारं घबाड काही संपत नाहीये. रोज नवनवे आकडे समोर येत आहेत. पुणे पोलिसांनी आज केलेल्या छापेमारीत आणखीन 33 लाख रुपये रोख सापडले आहेत... काल संध्याकाळी सुद्धा तुकाराम सुपे यांच्या घरी 25 लाख रुपये सापडले होते.. तर यापूर्वी टाकलेल्या पहिल्या धाडीत ८९ लाख रुपये आणि १० तोळं सोनं सापडलं होतं तर दुसऱ्या धाडीत १ कोटी ५८ लाख रोकड आणि दीड किलो सोनं सापडलं होतं. त्यामुळे तुकाराम सुपेनी अशी किती लूट केलेय याचा अंदाज बांधता येत नाहीये.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Pune Police Raid Commissioner State Examination Council Tukaram Supe Ghabad Numbers