Dev Deepawali: सप्तशृंगी गड दिव्यांच्या प्रकाशात उजळला, 'त्रिपुरारी पौर्णिमे'निमित्त भाविकांची अलोट गर्दी
Continues below advertisement
राज्यातील एक महत्त्वाचं शक्तीपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी (Saptashrungi) गडावर त्रिपुरारी पौर्णिमेचा (Tripurari Purnima) मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. 'सोबतच पणत्यांच्या प्रकाशामध्ये दिव्यांच्या प्रकाशामध्ये हा गड उजळून गेलाय', अशी माहिती मिळत असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला देव दिवाळी (Dev Deepawali) असेही म्हटले जाते, कारण या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, ज्यानंतर देवांनी दिवे लावून आनंद साजरा केला होता. सप्तशृंगी गडावर देवीच्या मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून, पणत्या आणि दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. या विशेष दिवसाचे औचित्य साधून हजारो भाविक सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गडावर दाखल झाले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement