Tripura Violence चे महाराष्ट्रात हिंसक पडसाद, मालेगाव, नांदेड, अमरावतीतील आजची परिस्थिती काय?

Continues below advertisement

 मालेगाव, नांदेड आणि अमरावती शहरांत काल मुस्लिम समाजानं काढलेल्या मोर्चांना हिंसक वळण लागल्यानंतर आज तिथली परिस्थिती नियंत्रणात आहे. त्रिपुरामधील कथित हिंसाचाराच्या विरोधात काल राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. मोठा जनसमुदाय मोर्चानं निघाला असताना काही ठिकाणी त्याला हिंसक वळण लागलं होतं. मालेगाव आणि नांदेडमध्ये जमावानं दगडफेक केली, तर नांदेडमध्ये जाळपोळीचे प्रकारही घडले. अमरावतीत आंदोलकांनी अनेक दुकानांची तोडफोड केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. यावेळी काही पोलीसही जखमी झाले आहेत. राज्यातली परिस्थिती नियंत्रणात असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram