आदिवासी विद्यार्थीनींना प्रशिक्षण दिलंच नाही, पण खर्च दाखवला! भाजप आमदाराचा प्रश्न, सरकार अनुत्तरीत
नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत महिला आणि बाल कल्याण विभागाच्या वतीने सातवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना संगणक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आणि यावरून विधानसभेत सरकारची कोंडी केली.