Tribal Protest: पालघरमध्ये आरक्षणासाठी आदिवासींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा
Continues below advertisement
पालघर (Palghar) जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या आरक्षणात बंजारा आणि धनगर समाजाची घुसखोरी होत असल्याचा आरोप करत भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजप खासदार हेमंत सवरा (Hemant Savara) आणि शिवसेना उपनेते जगदीश धोंडी यांच्यासह सर्वपक्षीय आदिवासी नेते आणि संघटना सहभागी झाल्या होत्या. ‘आदिवासी समाजावर घाला घातला, तर राजीनामे फेकून द्यायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही,’ असा थेट इशारा लोकप्रतिनिधींनी दिला. पालघरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. बंजारा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (ST) समाविष्ट करण्याच्या कोणत्याही मागणीला तीव्र विरोध दर्शवण्यात आला. 'आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती'च्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात हजारो आदिवासींनी एकत्र येत आरक्षणातील संभाव्य घुसखोरी थांबवण्याची जोरदार मागणी केली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement