Alliance Talks : 'नवीन भिडूची आवश्यकता नाही' - Harshvardhan Sapkal यांचा स्पष्ट इशारा

Continues below advertisement
महाविकास आघाडी (MVA) आणि INDIA Alliance मधील नवीन सदस्यत्वावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. सपकाळ यांनी 'नवीन भिडूची आवश्यकता ही काँग्रेसला नाही, महाविकास आघाडीला नाही' असा स्पष्ट इशारा दिला आहे. दिल्लीतील बैठकीमुळे शिष्टमंडळात सहभागी होऊ शकलो नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मनसेकडून युतीचा प्रस्ताव आलेला नाही, आणि संविधान रक्षणासाठी कुणी सोबत येत असेल तर विचार करू, असंही सपकाळ यांनी सांगितलं. स्थानिक पातळीवर वाटाघाटी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. INDIA Alliance मध्ये नवीन सदस्यांचा समावेश करण्याबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचं सपकाळ यांनी ठामपणे सांगितलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola