Petrol Hike Strike : इंधन दरवाढीवरून वाहतूकदारांचा आक्रमक पवित्रा घेत चक्का जाम आंदोलनाचा इशारा
शंभरी पार डिझेलवर वाहतूकदार संघटनांमध्ये मोठी नाराजी बघायला मिळत आहे. त्याचसोबत डिझेलच्या दरांबाबत चिंता देखील सर्वांकडून व्यक्त केली जात आहे. अशातच वाढत्या डिझेलचा दरांसंदर्भात केंद्र आणि राज्यांनी काही निर्णय घ्यावा म्हणून वाहतूकदार संघटनांकडून चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.