Chandrapur चंद्रपूरच्या महावितरण कर्मचाऱ्यांची कमाल! लाकडी न्हावेतून वाहून नेलं ट्रान्सफॉर्मर
महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी कौतुकास्पद असे एक काम केले आहे. चंद्रपुरातील पोंभुर्णातील टोकगंगापूर या गावातील ट्रान्सफॅार्मर खराब झाले होते. या गावात पोहचण्यासाठी अ़डचणी होत्या मात्र त्या सर्व अडचणी पार करत महावितरणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चक्क वैनगंगा नदीतून जाण्याचा निर्णय घेतला. लाकडी न्हावेच्या साहाय्याने त्यांनी ट्रान्सफॅार्मर नेत गावातील विजपुरवठा सुरळीत केला. उर्जामंत्र्यांनी देखील महावितरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.