Trainee IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरांबद्दल काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्येही चौकशी
Trainee IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरांबद्दल काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्येही चौकशी
पूजा खेडकरांबद्दल काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्येही चौकशी मेडिकलला प्रवेशावेळी विकलांगता प्रमाणपत्र जोडलं होतं का? केंद्रातल्या अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात केंद्र सरकारच्या वतीनं चौकशी सुरू करण्यात आलीय. पूजा खेडकर पुण्यातील ज्या काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर झाल्यात तिथंही चौकशी करण्यात येतेय. २००७ साली पूजा खेडकर यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेताना विकलांगतेचं सर्टिफिकेट सादर केले होते का? त्यावेळी पूजा खेडकर यांचं संपूर्ण नाव काय नोंद करण्यात आलं होतं, याची माहिती नवले महाविद्यालयाला विचारण्यात आलीय. केंद्र सरकारमधील अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करतायत. त्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील यंत्रणेची मदत घेण्यात येतेय.