Pooja Khedkar : ओबीसी प्रमाणपत्राचा लाभ मिळावा म्हणून पूजा यांच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाचा बनाव?
जयदीप मेढे
Updated at:
24 Jul 2024 11:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTrainee IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरांना ओबीसी प्रमाणपत्राचा लाभ मिळावा म्हणून आई-वडिलांच्या घटस्फोटाचा बनाव
पूजा खेडकरांचे आईवडील मनोरमा आणि दिलीप खेडकरांचा घटस्फोट खरंच झाला होता का याचा तपास करण्याचे आदेश केंद्र सरकारने पुणे पोलिसांना दिलेत. पूजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट सादर केलं होतं. त्यासाठी त्यांनी आईवडिलांचा घटस्फोट झाल्याचं सांगितलं होतं. दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा २०१० साली घटस्फोट झाल्याचे पुरावे ए बी पी माझाच्या हाती लागलेत. मात्र हा घटस्फोट फक्त नावापुरती असल्याचे पुरावे देखील ए बी पी माझाकडे आहेत. ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी घटस्फोटाचा बनाव रचल्याचं दिसून येतंय.