Train Updates सिद्धेश्वर एक्स्प्रेस, हुतात्मा एक्स्प्रेस आजपासून धावणार, प्रवाशांना दिलासा ABP Majha
सोलापूर-पुणे प्रवास रेल्वेने करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर वाशिंबे-भाळवणी स्थानक दरम्यानचे काम पूर्ण झाले आहे. नव्या रेल्वे मार्गावरून रेल्वे धावण्यास देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे क्रॉसिंगला गाड्या थांबणार नसून आता सोलापूरकर पुण्याला साडेतीन तासांत पोहोचणार आहेत.या कामाची रेल्वे संरक्षा आयुक्तांनी पाहणी करून निरीक्षण केले. या कामामुळे मागील अनेक दिवसांपासून सोलापूर-पुणे मार्गावरील महत्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते. सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस, सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस या महत्वाच्या गाड्यासह जवळपास 15 गाड्या पुन्हा एकदा धावनार आहेत. दिवळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतूक पूर्ववत झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.