Nawab Malik : Kashiff Khan यांना अटक केल्यानंतर भाजपचं पितळ उघडं पडेल : नवाब मलिक

Continues below advertisement

Drugs Case NCB Update Nawab Malik Live : मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आज पत्रकार परिषदेत चांगलेच आक्रमक झाले. समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि भाजपवर (BJP) गंभीर आरोप त्यांनी केले. यावेळी ते म्हणाले की, होय, मी भंगारवाला आहे. माझी 100 कोटींची औकात नाही. मी बँकांचे पैसे लुटले नाहीत. मी चेक बाऊंस केले नाहीत, माझ्या घरी CBIची रेड पडली नाही. वयाच्या सोळाव्या वर्षांपासून मी भंगारचा धंदा केला आहे, असं मलिक म्हणाले. त्यांनी म्हटलं की,  माझं गोडाऊन आहे.  माझ्या आजोबाने कुठल्याही डाकूकडून सोन घेतलं नाही.  मी मुंबईत गोल्ड स्मगलिंग केलं नाही.  मी भंगीरवाला आहे. जी वस्तू उपयोगी नसते. त्याचे तुकडे करून पाणी करतो.  नवाब मलिक या शहरातील भंगार काढून त्याचे नट बोल्ट काढून त्याचे पाणी बनवणार, असंही मलिक म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram