Konkan Railway | खेड, विन्हेरे परिसरात दरड कोसळली, कोकण रेल्वे ठप्प! ABP Majha

जोरदार पावसामुळे खेडानजीक दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक रविवारी ठप्प झाली होती. त्यामुळे 13 पेक्षा अधिक तासांपासून कोकण रेल्वेचे प्रवासी अडकून पडले आहेत. कोकण रेल्वेमार्गावर (Konkan Railway) अनेक ठिकाणी एक्स्प्रेस ट्रेन जागच्या जागी उभ्या आहेत. यापैकी कोचीवेल्ली एक्स्प्रेस ट्रेन (Konakn Express Trains) गेल्या 13 तासांपासून चिपळूण स्थानकात उभी आहे. सुरुवातीला प्रवाशांना ही ट्रेन 4 तास उशिराने धावणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सोमवारची सकाळ उजाडली तरी ही एक्स्प्रेस ट्रेन चिपळूण स्थानकातच उभी आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

कोकण रेल्वेकडून गाडी चार तास उशीरा आहे, असे सुरुवातीला सांगण्यात आले. त्यानंतर रात्रभर रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आता सकाळपासून मुंबईला जाण्यासाठी एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, एक्स्प्रेस ट्रेनमध्ये असणारी प्रवाशांची प्रचंड संख्या पाहता एसटी बसेसची व्यवस्था कितपत पुरी पडणार, असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. काल रात्रीपासून कोचीवेल्ली एक्सप्रेसमध्ये रेल्वेकडून प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी किंवा खाण्याची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. याशिवाय, ट्रेनमधील शौचालयात पाणी नसल्याने स्त्री-पुरुष प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. या सगळ्यामुळे कोकण रेल्वेचे प्रवासी प्रचंड संतापले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola