Traffic Police : कारवाईसाठी खासगी फोनचा वापर केला तर पोलिसांवरच होणार कारवाई
Continues below advertisement
मोठा बदल राज्यातील सर्व वाहन चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वाहतुकीच्या नियमांचा भंग झाल्यास तुमच्यावर कारवाई करणाऱ्या पोलिसांनाच आता वाहतूक पोलीस प्रोटोकॉलचा भंग केल्यास कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत के सारंगाल यांनी या संबंधित परिपत्रक जारी केलं असून वाहनचालकांवर कारवाई करताना पोलिसांनी खासगी वाहन वा त्यांच्या खासगी मोबाईल न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असं न झाल्यास वाहतूक पोलिसांनाच दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.
Continues below advertisement