Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंमुळेच एसटी संप चिघळल्याचा कामगार संघटनांचा आरोप
Continues below advertisement
मुंबई : एसटी विलिनीकरणाबाबतची भूमिका सरकारने सुद्धा स्पष्ट सांगितली की ते शक्य नाही. आता त्यामध्ये सुधारणा अशी आहे कोर्टातून त्याबाबत समिती नेमून त्या समितीच्या बाबतची भूमिका आम्ही मान्य करु असं सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे विलिनीकरणाबाबतचा प्रश्न आता न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही असं जेष्ठ नेते खासदार शरद पवारांनी स्पष्ट केलं. एसटी संप आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी आज खासदार शदर पवार, राज्याचे मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी कृती समिती यांच्यामध्ये बैठक झाली. त्यानंतर शरद पवार बोलत होते.
Continues below advertisement