Maharashtra Tourism : कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने पुणे, सातारा येथील पर्यटनस्थळं खुली
एकीकडे राज्यातील शाळांबाबत कोरोनामुळे सावध भूमिका घेतली जातेय... तर दुसरीकडे पर्यटकांसाठी मात्र आनंदाची बातमी आहे... पुण्यातील सिंहगड, भीमाशंकर आणि साताऱ्यातलं महाबळेश्वर आणि पाचगणी देखील पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय... लेण्याद्री आणि अष्टविनायकाला जाणाऱ्या भाविकांनाही परवानगी देण्यात येणार आहे..मात्र गर्दी झाल्यास पुन्हा निर्बंध लावण्याचे संकेतही देण्यात आले आहेत..