Top Superfast News: 9 सेकंदात सुपरफास्ट बातम्या : 13 July 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Top Superfast News: 9 सेकंदात सुपरफास्ट बातम्या : 13 July 2024 : ABP Majha

मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासूनच पावसाची संततधार.  अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव, मालाड,कांदिवली,बोरिवलीत पावसाच्या सरी.

पुढील ४ दिवसासाठी सिंधुदुर्गाला पावसाचा ऑरेंज अलर्ट, जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार, मात्र कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. 

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरीमध्ये पुन्हा पाऊस, सकाळपासून बहुताश भागात पाऊस , १६ जुलैपर्यंत जिल्ह्याला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट. 

पुढचे पाच दिवस भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाचा यलो अलर्ट, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु. 

कल्याण डोंबिवली परिसरात संततधार पाऊस,  पावसामुळे काही भागातील विद्युत पुरवठा खंडित.

आज संपूर्ण नाशिक शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद तर उद्या सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार, दोन दिवस पाणी जपून वापरा, मनपाचं नाशिककरांना आवाहन.

ठाणे महापालिका क्षेत्रातील नौपाडा-कोपरीमध्ये काही भागात पाणीपुरवठा बंद, सोमवारी सकाळी १० वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram