Gadchiroli Naxal Surder : शस्त्र खाली संविधान हाती, गडचिरोलीत भूपतीसह ६० नक्षल्यांचं आत्मसमर्पण
Continues below advertisement
राज्यातील माओवादविरोधी लढ्याला मोठे यश मिळाले असून, माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो आणि सेंट्रल कमिटी सदस्य मல்லोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती (Mallojula Venugopal Rao alias Bhupathi) याने ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत हे ऐतिहासिक आत्मसमर्पण पार पडले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी एक मोठे विधान केले, 'पुढचा चॅलेंज हा शहरी नक्षलवाद आहे, कारण हे शहरी नक्षलवादी, माओवादी भारताचं संविधान मानत नाही... पण संविधानच जिंकेल.' भूपतीवर विविध राज्यांमध्ये मिळून ६ कोटींपेक्षा जास्त रकमेचं बक्षीस होते आणि तो नक्षल चळवळीचा मास्टरमाइंड मानला जात होता. या आत्मसर्पणामुळे तथाकथित 'रेड कॉरिडॉर'मधील माओवाद संपुष्टात येण्याची सुरुवात झाली आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement