Top Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट : 7.30 PM Latest news
Top Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट : 7.30 PM #abpमाझा
ही बातमी पण वाचा
'शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड संतापले, म्हणाले...
Jitendra Awhad on Devendra Fadnavis, मुंबई : "आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की, शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. पण, महाराजांनी सूरत लुटली नव्हती, महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला होता, किंवा त्यांच्यावर आक्रमण केलं होतं. पण, सूरत कधी लुटली नव्हती, जणू काही सर्वसामान्य लोकांची लूट करायला महाराज गेले अशा प्रकारचा इतिहास काँग्रेसने आम्हाला इतकी वर्ष शिकवला, त्याला माफी मागायला सांगणार आहात का?" असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. याबाबत आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची चॅलेंज दिलं आहे.
जितेंद्र आव्हाड काय काय म्हणाले?
जितेंद्र आव्हाड म्हणाले, देवेंद्र फडणवीस साहेबांनी कहर केला. महाराजांनी सुरत लुटली नाही, सुरत लुटली नाही फक्त छावनी लुटली, असं फडणवीस साहेबांचा म्हणणं आहे. आज माझं आव्हान आहे, बर्नियर नावाचे इतिहासकार होते त्यांनी हे लिहून ठेवलय. त्याकाळी सुरत हे व्यापारचे ठिकाण होते. त्यांनी महाराजांच्या विरोधातल्या लढाईत सुरतमधून मदत गेली हा राग होता. हा आमचा अभिमान आहे. फडणवीस सांगतात हे सगळं काँग्रेसने केलय. इतिहासकरांना काँग्रेस पक्ष सांगायला गेला होता का? महाराज छावनी लुटायला गेलेले असं म्हणतात पण तसं नाही. महाराज स्वराज्य घडवायला जन्माला आले होते. तुम्ही महाराजांना लहान करताय. महाराजांचे शौर्य कमी करण्याचा प्रयत्न करतायत.