TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 06 June 2024 : ABP Majha

Continues below advertisement

आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा, रायगडावर विविध कार्यक्रमाचं आयोजन, छत्रपती संभाजी महाराज आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडणार.

रायगडावर होणाऱ्या शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांकडून संपुर्ण खबरदारी, रायगडावर  येणाऱ्या शिवभक्तांनी सूचनांचे पालन करणे गरजेचे, पोलीस अधीक्षकांची माहिती.   

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवप्रेमी दाखल, दुर्गराज रायगडावर मोठी गर्दी

कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर शिवराज्याभिषेक सोहळा, शाहू महाराजांच्या उपस्थितीत शाही सोहळ्याला सुरुवात. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर  राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आज मुंबईत तातडीची बैठक, बैठकीसाठी पक्षाच्या सर्व आमदारांना पाचारण.

महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत  देवेंद्र फडणवीसांचं उपमुख्यमंत्री पद सोडण्याचं सूतोवाच. केंद्रीय नेतृवाला पदातून मोकळं करण्याची विनंती करणार, देवेंद्र फडणवीसांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य. 

संविधान बदलणार असा जो प्रचार केला गेला त्याचा महाराष्ट्रात फटका बसला, महाराष्ट्रात अपेक्षीत यश मिळालं नाही, पत्रकार परिषदेतून फडणवीसांचं वक्तव्य. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram