TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :18 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

आज प्रचाराचा शेवटचा दिवस, संध्याकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा, जवळपास सर्व नेते आपापल्या होमग्राऊंडवर सभा, रॅली आणि शक्तीप्रदर्शन करणार

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुती मविआत जाहिरात वॉर, वृत्तपत्रांमध्ये भाजपकडून से नो टू कँग्रेसच्या जाहिराती, तर काँग्रेसकडून "महाअभद्र युतीचा महाअभद्र कारभार, हद्दपार करू भ्रष्टयुती सरकार आशयाची जाहिरात.

उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून एक्स पोस्टच्या माध्यमातून विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न,जे बोलतो, ते करून दाखवतो!"  अशा आशयाची पोस्ट.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या आज मुंबईत सांगता सभा, मुंबादेवी मतदारसंघात शिंदेंची तर वांद्र्यात वरुण सरदेसाईंसाठी ठाकरेंची सभा. 

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप नेत्यांच्या सभांचा धडाका, फडणवीस आणि गडकरींच्या विदर्भात सभा, तर जे.पी नड्डा नवी मुंबईत मंदा म्हात्रेंसाठी सभा घेणार.

आज इंदापूर आणि बारामतीत शरद पवार आणि अजित पवारांच्या एकाच वेळी सभा, काका पुतणे इंदापुरात दुपारी 1 आणि बारामतीत दुपारी 2 वाजता सभा घेणार. 

राज्यात नजर ठेवण्यासाठी भाजपनं गुजरातमधून महाराष्ट्रात माणसं आणली, हे पंकजा मुंडेच बोलल्या, मविआच्या सभेत ठाकरेंकडून पंकजा मुंडेंचं कौतुक. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram