TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 06 June 2024 : ABP Majha

Continues below advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५१ वं वर्षे आहे. आज ६ जून रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलीय. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त रायगडावर येत आहेत. ढोलताशांच्या गजरात शककर्ते शिवरायांना मानवंदना दिली जात आहेत. कोल्हापूर गादीचे शहाजी राजे आणि संभाजीराजे रायगडावर जाणार आहेत. 

मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर, आज मोसमी वारे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता. 

राज्यातील शनिवारपासून जोरदार पावसाचा इशारा,  मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पश्चिम घाटात जोरदार पावसाचा अंदाज. 

आज आणि उद्या दक्षिण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज.

सिंधुदुर्गमधील कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडी, दोडामार्ग तालुक्यात मान्सून पूर्व पावसाची हजेरी, हवामान विभागाकडून आज, उद्या यलो अलर्ट जारी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram