TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 June 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 June 2024 : ABP Majha
आज महाराष्ट्र सीईटीचा निकाल जाहीर होणार, अभियांत्रिकी, फार्मसी प्रवेशाच्या सीईटीच आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून निकाल पाहता येणार.
महाविद्यालयात निश्चित झालेला प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास, किंवा इतर शिक्षण संस्थेत स्थलांतरित करायचं झाल्यास महाविद्यालय किंवा विद्यापीठाला फीचा संपूर्ण परतावा देणे बंधनकारक, शिक्षण संस्थांना 'यूजीसी'च्या सूचना.
महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला स्टेट बँक ऑफ इंडियाने दिला दणका. SBIच्या गृहकर्जात वाढ. तसंच कर्जदारांना भरावा लागणार अधिकचा इएमआय.
आज मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक असणार, तर पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नाही.
आज हार्बर रेल्वे मार्गावरही मेगाब्लॉक, सकाळी ११. १० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत कुर्ला- वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार.
मध्य रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी लोकल, मेल-एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासणी मोहिम, एप्रिल ते मे या दोन महिन्यांत पुकट्या प्रवाशांकडून ६३.६२ कोटी दंड वसूल.