TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

महात्मा गांधींची आज जयंती, यानिमित्त राजघाटावर जात राहुल गांधींनी घेतलं गांधीजींच्या स्मृतीस्थळाचं दर्शन तर विजयघाटावर लालबहादुर शास्त्रींनाही राहुल गांधींकडून नमन. 
महात्मा गांधींची आज १५५ वी जयंती, पंतप्रधान मोदींनी राजघाटावर घेतलं गांधीजींच्या स्मृतीस्थळाचं दर्शन.
गांधी जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेन्द्र मोदी स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात सहभागी होणार, मोदी 9 हजार 600 कोटींपेक्षा अधिक स्वच्छतेशी संबंधित प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करणार.    
वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमात गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, रामधून, श्रमदान, सूतकताईतून केलं गांधीजींना अभिवादन. 
गांधी जयंतीनिमित्त आज इंडिया आघाडीची मुंबईत पदयात्रा, राज्यातील महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी पदयात्रा, इंडिया आघाडीचे मान्यवर नेते आणि सिव्हिल सोसायटींचे प्रतिनिधी पदयात्रेत सहभाही होणार.
नागपूरमध्ये आज भाजपची महत्वाची बैठक,नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित.  
यंदा महायुतीचे सरकार येईल, ही काळ्या दगडावरची रेघ, अमित शाहांनी संवाद मेळाव्यात व्यक्त केला विश्वास. मात्र २०२९ मध्ये एकट्या भाजपाच्या जीवावर सरकार करायचं असल्याचंही केलं विधान.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram