TOP 80 News | सकाळी आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट | 20 जुलै 2024 | ABP Majha

Continues below advertisement

TOP 80 News | सकाळी आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट | 20 जुलै 2024 |  ABP Majha 

मुंबईतील  पावसाचे अपडेट्स

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. शनिवारी पहाटेपासूनही मुंबईत मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार येत्या काही तासांमध्ये मुंबईत आणखी मुसळधार (Mumbai Rain) पाऊस होण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम मुंबईतील रेल्वे (Mumbai Local Train) आणि रस्ते वाहतुकीवर होण्याची दाट शक्यता आहे.   आज पहाटेपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे प्रथेप्रमाणे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईत सध्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी दिसत आहे. त्यामुळे पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, पहाटेपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील सखल भागांमध्ये आतापासूनच पाणी साचले आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेने पाणी उपसण्यासाठी पंप लावल्याने पाण्याचा निचरा झाल्यास कोणतीही समस्या उद्भवणार नाही. परंतु, पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची  शक्यता आहे. वसई, विरार, नालासोपाऱ्यात सकाळपासून  पावसाची रिपरिप  सुरू आहे. हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलार्ट दिला आहे. दोन दिवसांपासून नसई विरार मध्ये  संततधार पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. सध्या वसई विरार शहरात कुठेही पाणी साचले नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram