TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 12 June 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील अनेक भागांमध्ये आज पावसाचा अंदाज, हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट तर विदर्भ आणि मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी.
धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम, मुंबईतल्या धरणांतील पाणीसाठा ६ टक्क्यांच्या खाली, पुढीचे काही दिवस पाणी जपून वापरावं लागणार.
बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात रात्री विजेच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस, बोर्डी नदीला पूर आल्याने बेलुरा, खोलखेड, खोलखेड खुर्द, मोरगाव गावांचा खामगाव शहराशी संपर्क काही काळ तुटला होता.
सोलापूरमध्ये काल सकाळी साडे आठ ते आज पहाटे साडे पाचपर्यंत ५०.३ मिमी पावसाची नोंद.
नाशिकच्या चांदवड इथे आसरखेडे गावात ढगफुटीसदृश पाऊस, द्राक्ष बागांना पावसामुळे नदीचं स्वरुप, गेल्या दोन दिवसांपासून चांदवडमध्ये पाऊस सुरु.
हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस, शहरातील मस्तानशहा नगरमध्ये नाल्याचं पाणी घरात शिरल्यानं संसारोपयोगी साहित्याचं नुकसान, नालेसफाईच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित.
सोलापूर शहरातही पावसाची हजेरी, सर्वसामान्यासह बळीराजाही सुखावला.
हिंगोलीमध्ये जोरदार पाऊस, वसमत शहरात अनेकांच्या घरात पाणी शिरलं, पहिल्याच पावसात सगळीकडे पाणीच पाणी झाल्यानं नागरिक हैराण.