TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

गद्दारांना वापरता यावं म्हणून बाळासाहेबांचं नाव राष्ट्रीय पुरुषांच्या यादीत टाकलं, हिम्मत असेल तर शिंदेंनी त्यांच्या वडिलांचं नाव वापरुन मैदानात यावं, उद्धव ठाकरेंचं आव्हान. 

संपूर्ण मुंबई अदानींच्या घशात घालायला निघालेत, जिथे जातील तिथे अदानी हे भाजपचं धोरण, सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये अदानींसाठीचे आदेश फाडून टाकणार. उद्धव ठाकरेंची घोषणा.

आम्हाला दम दिल्यास तुमच्या नाकातोंडात भूसा घालू, मुख्यमंत्री शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर, सरकार आल्यावर शिंदेंसह इतरांना जेलमध्ये टाकण्याचा ठाकरेंनी दिला होता इशारा. 

राज्यात नजर ठेवण्यासाठी भाजपनं गुजरातमधून महाराष्ट्रात माणसं आणली, हे पंकजा मुंडेच बोलल्या, मविआच्या सभेत ठाकरेंकडून पंकजा मुंडेंचं कौतुक. 

रावण, कंस आणि अफजलखानाचा वध मोदींनी केला असं सांगायलाही भाजपचे लोक कमी करणार नाहीत, राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर ठाकरेंची प्रतिक्रिया, बाबासाहेब आंबेडकरांना मोदींनी भारतरत्न दिल्याचं राजनाथ सिंहांचं वक्तव्य.

कलम ३७० काढताना आम्ही भाजपला पाठिंबा दिला, अमित शाहांनी केसाला ब्राह्मी तेल लावावं, केसही येतील आणि स्मरणशक्तीही वाढेल, उद्धव ठाकरेंचा अमित शाहांना टोला. 

आठ दिवसांत महायुतीचं सरकार जाणार, सरकार बदला, सोयाबीनला सात हजार रुपये भाव आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करुन दाखवणार, ठाकरेंचं आश्वासन. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram