Top 80 | सकाळी आठच्या 80 बातम्या सुपरफास्ट आढावा 22 July 2024 ABP Majha

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची रिपरिप सुरु , मध्यरात्री विश्रांती घेतल्यानंतर पहाटेपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात.

मुंबईत आज हवामान खात्याकडून यलो अलर्ट जाहीर, काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची विश्रांती, पावसाने उसंत घेतल्याने जिल्ह्यातील पूरही ओसरला.  

पालघर जिल्ह्याला आजपासून तीन दिवस यलो अलर्ट, गेले चार दिवस जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून सूर्या आणि वैतरणा नद्यांना पूर. धामणी धरण ५३ टक्के भरले. 

रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांचे आदेश 

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा सुरु ठेवा, नादुरुस्त किंवा धोकादायक इमारतींमध्ये शाळा भरु नये, कोल्हापूर जिल्हा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या सूचना. 

नागपूरमध्ये पावसाचा जोर कायम, नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. 

गेल्या ३ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे गडचिरोलीतील अनेक गावांचा संपर्क तुटला, खबरदारी म्हणून आज सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola