TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha 

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या काही तासांमध्ये मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पाठिंबा देण्याची अजित पवार यांची कथित स्मार्ट खेळी आता त्यांच्यासाठीच अडचण ठरत असल्याची माहिती समोर आली आहे. कारण, सोमवारी अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर तिष्ठत बसण्याची वेळ आली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाला तत्परतेने दिलेल्या पाठिंब्यामुळे महायुतीचे वरिष्ठ नेते नाराज आहेत का, अशी कुजबुज सुरु आहे. त्यामुळे आता अजित पवार यांना अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीत ताटकळत बसण्याची वेळ आल्याचे सांगितले जाते.   राज्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरु असणाऱ्या दबावतंत्रामुळे आपल्या वाटच्या खात्यांना कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी अजित पवारांनी सोमवारी अचानक दिल्ली गाठल्याची चर्चा होती. अजित पवार हे दिल्लीत अमित शाह यांना भेटायला आले होते. मात्र, अमित शाह हे अजित पवार यांना न भेटता चंदीगढला निघून गेले. चंदीगढमध्येय फौजदारी कायद्यासंदर्भातील एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी आणि अमित शाह दोघेही हजर होते. त्यामुळे अजित पवार यांना दिल्लीत ताटकळत बसावे लागले. अमित शाह यांच्यासोबत त्यांचा मुलगा पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलही उपस्थित आहेत. अमित शाह यांची भेट घेण्याच्या उद्देशाने या सगळ्यांची एक बैठक झाली होती. मात्र, अमित शाह आणि पंतप्रधान मोदी चंदीगढला निघून गेल्यामुळे अजितदादांना दिल्लीतील मुक्काम वाढवावा लागला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram